YOU ARE HERE: Home

युवा पुरस्कार अर्ज २०१२

E-mailPrintPDF

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई
नवमहाराष्ट्र युवा अभियान
राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०१२

 

Last Updated on Thursday, 08 September 2011 07:30
 

मुलीच्या जन्माच्या स्वागतासाठी लोकजागृती हवी

E-mailPrintPDF

आर.आर. पाटील यांचे मत, 'जागर जाणिवांचा तुमच्या आमच्या लेकींचा' पदयात्रेस प्रारंभ

शिरवळ (जि.सातारा) - 'प्रत्येकाला आई पाहिजे,पत्नी पाहिजे,बहीण पाहिजे, मात्र मुलगी नको ही मानसिकता समाजाचे स्वास्थ बिघडून टाकेल, अशी भीती व्यक्त करतानाच मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी लोकजागृती आणि लोकशिक्षण हेच प्रभावी साधन असल्याचे मत राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज (गुरुवारी) येथे केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने स्त्री-भ्रूण हत्येविरोधात जनजागृती करण्यासाठी "जागर जाणिवांचा, तुमच्या आमच्या लेकींचा ' पदयात्रेचा प्रारंभ सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगांवात आज झाला. यावेळी आयोजित केलेल्या सभेत आर.आर.पाटील बोलत होते. ते म्हणाले,"" आज जन्माला येण्याचा मुलींचा हक्कच नाकारला जात आहे. त्यामुळे स्त्री पुरुष यांचे प्रमाण ढासळले आहे. मुलगी नको ही मानसिकता भविष्यात समाजाचे स्वास्थ बिघडून टाकेल. त्यामुळे सामाजिक स्वास्थ टिकेल का नाही अशी आपणास भीती वाटते. सोनोग्राफीसारखे तंत्रज्ञान समाजाचा अधःपात करेल की काय ? अशी शंका येते. जे डॉक्‍टर तयार करण्यासाठी सरकारी तिजोरीतून लाखो रुपये खर्च केले, तेच डॉक्‍टर आज कसायाची भूमिका पार पाडत आहेत. त्यामुळे जाणीव जागृतीची समाजात गरज आहे. केवळ कायदा करून उपयोग होणार नाही. लोकजागृती व लोकशिक्षण हेच प्रभावी साधन ठरेल.''
सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टीचा लोकार्पण सोहळा सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी आर.आर.पाटील, छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून नायगाव ते पुणे या स्त्री-भ्रूणहत्याविरोधातील जागृती पदयात्रेला प्रारंभ झाला.

 

राज्यस्तरीय जागर हा जाणिवांचा गणेशोत्सव आरास स्पर्धा

E-mailPrintPDF

नवमहाराष्ट्र युवा अभियान व साम मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने

विषय:

  1. करूया स्री -जन्माचे स्वागत

  2. स्री-भ्रूण हत्या : एक अक्षम्य चूक

  3. सक्षम स्री - सक्षम भारत

» माहितीपत्रक

» प्रवेशिका अर्ज

 

जागर हा जाणिवांचा; तुझ्या माझ्या लेकीचा

E-mailPrintPDF

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या माध्यमातून

जागर हा जाणिवांचा; तुझ्या माझ्या लेकीचा

उपक्रमास पदयात्रेने प्रारंभ

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या विश्वस्त सुप्रिया सुळे यांचा उपक्रम

 

२५ ते २८ ऑगस्ट २०११ या कालावधीत सुरुवात.

गेल्या काही वर्षात देशातील व राज्यातील लिंग गुणोत्तराचे प्रमाण सातत्याने घटते आहे. स्रीभ्रूण हत्येचे वाढते प्रमाण आगामी काळात भयानक उग्र सामाजिक समस्या निर्माण करतील. यासाठी तातडीने उपाय करायला हवे. समाजाच्या सर्व वर्गात 'मुलगा हवा, मुलगी नको' या हट्टाने संतुलन उध्वस्त होण्याचा धोका संभवतो. एकूणच समाजाची ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. यास्तव "जागर हा जाणिवांचा; तुझ्या माझ्या लेकीचा' हा उपक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.

 

Welcome to Navmaharashtra Yuva Abhiyan

E-mailPrintPDF
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
नवमहाराष्ट्र युवा अभियान

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई ही संस्था गेल्या २५ वर्षांपासून महाराष्ट्राच्या समाजकारणात भरीव व मोलाचे कार्य करीत आहेत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातला पुरोगामी महाराष्ट्र उभा करण्याचे ध्येय प्रतिष्ठानने अंगी बाळगले आहे. याच भूमिकेतून प्रतिष्ठानचा विस्तार केंद्रीय कृषिमंत्री मा.ना.शरदचंद्रजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील ८ विभागीय केंद्रांमध्ये झालेला आहे. प्रतिष्ठानचे विविध विभाग महाराष्ट्रात कार्यान्वित असून त्यामध्ये नवमहाराष्ट्र युवा अभियान, महाराष्ट्र महिला व्यासपीठ, कृषी व सहकार व्यासपीठ, कायदेविषयक सल्ला फोरम, यशस्विनी अभियान, अपंग हक्क व विकास मंच, शिक्षण विकास मंच असे विभाग आहेत.
 

Background

E-mailPrintPDF
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झालेली असताना राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण खात्याने युवा धोरण अद्यापपर्यंत जाहीर केलेले नाही. राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे निम्मी लोकसंख्या ही १३ ते ३५ वयोगटातील युवांची आहे व या मोठ्या प्रमाणावरील गटासंदर्भात शासनाच्या त्यांच्या विकासासंधार्भातील भूमिका स्पष्ट व्हायला हव्यात व ग्रामीण, शहरी, आदिवासी, दलित, अल्पसंख्याक युवांच्या विकासासंदर्भात शासनाने विशेष योजना राबविल्या पाहिजेत. या संदर्भातील पथदर्शी सूचनांचा अंतर्भाव युवा धोरणात असणे गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण हे भविष्यकाळात युवांच्या विकासाबरोबरच राज्याच्या विकासासाठी देखील पूरक ठरेल.

राज्य युवा धोरणाने महाराष्ट्रातील सर्व स्तरांतील युवांना कर्तव्य व जबाबदार्‍यांचे भान देतानाच त्यांच्या आशा-आकांक्षा व गरजांना न्याय देणेही अभिप्रेत आहे.

- सुप्रिया सुळे, निमंत्रक, नवमहाराष्ट्र युवा अभियान
 

News

Latest Events

Download Abhisaran Form