सृजन मित्र आणि मैत्रिणींनो, ही जागा तुमची... तुमच्या अभिव्यक्तीसाठी... बNयाच वेळा आपल्याला आपल्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातील खूप काही गोष्टी शेअर कराव्याशा वाटतात, सांगाव्याशा वाटतात; परंतु सर्वांनाच अशी जागा मिळते असे नाही आणि म्हणूनच नवमहाराष्ट्र युवा अभियान आपल्या युवा मित्र-मैत्रिणींना उपलब्ध करून देत आहे हे खुलं व्यासपीठ... या ठिकाणी तुम्ही तुमचे अनुभव, लेख, कथा, कविता, विचार, वेगवेगळ्या कलाकृती, चित्र, गाणी, व्हिडिओ शेअर करू शकता. या ठिकाणी तुम्ही खुलेपणानं मांडू शकता तुमचं जग आणि जाणून घेऊ शकता तुमच्यासारख्याच इतरांचंही... तर मग बघताय काय? करा सुरुवात...
|
माझं अभिसरण (संकेत सबनीस)
Saturday, 01 January 2011 14:02
administrator ''लातूर एस. टी. वर्कशॉप''.... रात्री १.३० वाजता अशी हाक ऐकून त्या एस. टी. तले पाच जण खडबडून जागे झाले आणि मग त्यांची बॅगा उतरावयाची एकच तारांबळ उडाली. सात तास प्रवास करुन पुढच्या दोन तासाच्या प्रवासाची उर्जा मिळविण्यासाठी लातूरच्या सौ. आशा भिसे यांच्याकडे ते मुक्कामाला उतरले आणि तेथूनच सकाळी ते मराठवाडयाचे ग्रामीण जीवन जगण्याच्या एका मनस्वी ध्येयाकडे रवाना झाले.
अभिसरण मोहीमेच्या औरंगाबाद येथील कार्यक्रमात कोकणातल्या विविध जिल्हयातून आलेल्या तरुणांचे गट तयार करण्यात आले. त्यात माझ्यासह असलेल्या पाच जणांच्या गटाला लातूर जिल्हा आणि त्यातील उदगीर, औसा, रेणापूर आदि तालुके मिळाले व आमची मोहीम सुरु झाली.
|
अभिसरण कविता (स्वप्नाली जगदाळे)
Saturday, 01 January 2011 13:51
administrator
मित्रांनो, आज एक गोष्ट तुम्हाला सांगायची
अभिसरणमध्ये अनुभवलेल्या वेगळ्या अशा अनुभवांची
पहिले ठिकाण पैठण, गाव आहे छोटे
पण महत्त्व त्याला मोठे!
भेट दिली इकडे आम्ही खुल्या कारागृहाला
लोखंडी सळया आणि जेलर नसलेल्या वेगळ्या
अशा जेलला. इकडे वैâद्यांसाठी बिलकुल
No संचारबंदी खरंतर हीच त्यांना
सुधारण्याची सुवर्णसंधी
Last Updated on Saturday, 01 January 2011 13:57 | |
|
|
|