YOU ARE HERE: Home सृजन सृजन माझं अभिसरण (संकेत सबनीस)

माझं अभिसरण (संकेत सबनीस)

ई-मेलप्रिंटपीडीएफ़

''लातूर एस. टी. वर्कशॉप''.... रात्री १.३० वाजता अशी हाक ऐकून त्या एस. टी. तले पाच जण खडबडून जागे झाले आणि मग त्यांची बॅगा उतरावयाची एकच तारांबळ उडाली. सात तास प्रवास करुन पुढच्या दोन तासाच्या प्रवासाची उर्जा मिळविण्यासाठी लातूरच्या सौ. आशा भिसे यांच्याकडे ते मुक्कामाला उतरले आणि तेथूनच सकाळी ते मराठवाडयाचे ग्रामीण जीवन जगण्याच्या एका मनस्वी ध्येयाकडे रवाना झाले.
अभिसरण मोहीमेच्या औरंगाबाद येथील कार्यक्रमात कोकणातल्या विविध जिल्हयातून आलेल्या तरुणांचे गट तयार करण्यात आले. त्यात माझ्यासह असलेल्या पाच जणांच्या गटाला लातूर जिल्हा आणि त्यातील उदगीर, औसा, रेणापूर आदि तालुके मिळाले व आमची मोहीम सुरु झाली.

नव महाराष्ट्र युवा अभियान आयोजित, ''कोकण ते मराठवाडा'' युवा अभिसरण मोहिम या कार्यक्रमाअंतर्गत कोकणातील माझ्यासारखी तरुण मंडळी मराठवाडयातील सामाजिक चळवळ, भाषा, संस्कृती, विचार, ग्रामीण जनता, खाद्य संस्कृती, शेती व्यवस्था आणि सरतेशेवटी तेथील माणूस आणि त्याचं जीवन जगण्यासाठी व अनुभवण्यासाठी आली होती.

औरंगजेबाचा दख्खन प्रांतातील गढ त्याचबरोबर स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही एक वर्ष टिकलेला निजामशाही अंमल त्याकरीताचा मराठवाडा मुक्ती संग्राम, आत्ता-आत्ताचे मराठवाडा विकास आंदोलन अशी ऐतिहासीक व चळवळीची पाश्र्वभूमी मराठवाडयाला आहे. या सर्वांची जाणीव मी लातुर जिल्हयात उदगीर येथे पोहचलो तेव्हा मला झाली. उदगीरचा उदयगीरी किल्ला जो की, इ. सन. १७६० साली निजामाकडून पेशव्यांनी जिंकला होता हा किल्ला आजही भव्य व अभेद्य वाटतो.

तसेच उदगीर येथील इमू पालन केंद्र, आशियात प्रसिध्द असलेला व दहा बाय दहा च्या झोपडीवजा खोलीत ''हिरा'' म्हणून प्रसिध्द असलेला अडकित्याचा कारखाना, माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांमुळे उदगीर येथे आलेला मोठा दुध भुकटी प्रकल्प, मराठवाडयातील समाजवादी विचारांचे प्रणेते डॉ. ना.य .डोळे यांच्या घरातील निवास व त्यांचे कुटूंबीय आदि गोष्टी मोहीमेच्या पहिल्याच दिवशी पाहून व ऐकून उदगीर शहराचे वैविध्य आम्हांस दिसून आले. पहिल्याच दिवशी आम्हांला मुक्काम उदगीर तालुक्यातील चिगळी या गावी झाला तिथे गावाच्या गा्रमपंचायत कार्यालयात आम्ही झोपलो होतो. झोपण्यापूर्वी गावातले बरेचसे लोक आम्ही कुठून आलो, का आलो आदि प्रश्न विचारण्यासाठी येत होते सकाळी उठल्यावरही हाच प्रकार घडला शेवटी आम्ही सर्वांना सांगीतले की तुुम्हाला प्रत्येकाला भेटणार आहोत तेव्हा हा प्रकार थांबला. चिगळी गावच्या पाटीलांना भेटून त्यांच्याकडून आम्ही गावाची व तेथील शेतीव्यवस्थेची माहिती घेतली त्यांच्याकडून बाहेर पडतोच तो एक १०४ वर्षांचे आजोबा आपल्या पणतील घेऊन दूरवर शाळेत घेऊन चालले होते. मराठवाडा शिक्षणात अग्रेसर आहे याची प्रचिती तेव्हाच आम्हाला आली. आजोबांबरोबर फोटो काढून गावच्या मंदीरात सरपंचांनी आयोजित केलेल्या सत्काराच्या कार्यक्रमात आम्ही गेलो. पहिल्यांदाच सत्कार होत असल्याने आमच्यातला प्रत्येक जण भारावून गेला होता.

गावातला पाण्याचा प्रश्न, शेतीचा प्रश्न, स्वच्छतेचा प्रश्न, आमच्या मोहिमेचा उद्देश आदी बNयाच विषयांवर चर्चा झाली. आमचा पुढचा मुक्काम याच तालुक्यातील चिमाची वाडी येथे पडला. निर्मल ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आदि विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेले हे गांव. शरीर वजन योग्य प्रमाण गुणोत्तर (ँ श् घ्) ही संकल्पना चित्ररुपात जमिनीवर चितारली असून गावातील झाडांची वृक्षगणना देखील झाली आहे. अशा अभिनव संकल्पनांनी युक्त गाव पहातांना गावकNयांचे फार अप्रूप वाटले. आमच्या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरु होत होता लातूर जिल्हयातील औसा तालुक्यातून हा औसा तालुका एका मोठया नैसर्गिक आपत्तीमुळे प्रसिध्दीस आला कारण १९९३ साली आलेल्या ६.८ रिस्टर स्केलच्या भूवंâपामुळे येथील किल्लारीसह ५२ गांवे नामशेष झाली तेव्हाच्या राज्य सरकारने त्वरीत केलेल्या उपाययोजनेमुळे येथील गांवे लवकरच मुळ ठिकाणपासून १-२ कि. मी. दूर पुर्नवसित झाली. औसा तालुका हा भूवंâपामुळे होरपळला असला तरी येथील गावा-गावांत वैचारीक चळवळी चालू असलेल्या दिसल्या, याचे उत्तम उदाहरण म्हणजे संपूर्ण औसा तालुका ''युनिसेफ'' या आंतरराष्ट्रीय संस्थेचे तर्फे पहात असलेले कार्यकर्ते श्री. विलास सुरवसे हे गावाचे सुक्ष्म व्यवस्थापन, दिपfिशखा किशोरी गट, खेळांच्या माध्यमातून महिला सबलीकरण आदि बNयाच संकल्पना येथील गावात राबवितांना दिसले. दिपशिखा किशोरी गटा मुळे येथील गावांमध्ये युवतींमध्ये वैचारिक व आरोग्यासंबंधी जागृती होत असलेली दिसून आली. येथील बहुतांश गावे पुर्नवसित असल्याने या तालुक्यात पहिल्याच दिवशी तळणी या गावात रात्री झोप आली नाही. (भूवंâपाच्या भितीने) दुसNया दिवशी किल्लारी येथे गेलो असता किल्लारीचे निळवंâठेश्वर मंदीरासमोर पडलेले भेसूर भग्नावशेष पाहून आमच्या अंगावर काटा आला आणि पाचही जणांनी रस्त्यावर उभे राहून त्या किल्लारीच्या भग्नावशेषंच्या साक्षीने त्या दहा पंधरा हजार मृतांना आम्ही श्रध्दांजली वाहीली. रेणापूर हा आमचा पुढचा व मोहिमेतला शेवटचा तालुका रेणापूर तालुक्यातील घनसर गांव येथे उपसरपंच शरद दरेकर यांच्या घरी मुक्कामाला होतो. एक ऐतिहासीक वाडा वाटावा असे त्यांचे घर परंतु त्यांच्या घरात रशियन नेता लेनिन यांचा फोटो पाहून मला धक्का बसला. त्याबद्दल कुतूहलाने विचारले असता घरातील जेष्ठ व्यक्ती श्री. दरेकर यांनी त्यांच्यावर असलेला कम्युनिस्ट व साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव व मराठवाडा मुक्तीसंग्रामातील त्यांचा प्रत्यक्ष सहभाग त्यांनी सांगीतला.उदगीर शहरातील डॉ. ना. य. डोळे व ग्रामीण भागातील श्री. दरेकर या दोघांकडे पहाता मराठवाडयात होणाNया चळवळीकरीता लागणारे रसायन हे गावागावात भिनलं होतं.

लातुर मध्ये असलेली आमची ही मोहीम अशारीतीने संपत होती. येथील ग्रामीण जीवन जनतेची लढण्याकरीता लागणारी चिवट मानसिकता, खाद्य संस्कृती सरतेशेवटी येथील माणसे यांच्याकडून आम्ही जीवन जगण्यासाठी लागणाNया बNयाच गोष्टी घेऊन आम्ही आमच्या गावाला रवाना झालो.

- संकेत सबनीस
ॐ गुरुदेव अपार्टमेंट, गणेश चौक, बदलापूर(प).पिन- ४२१५०३.
मो.नं. ९८९०१३७३६२.
इ-मेल: हा ई-मेल स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा.

 

Add comment


Security code
Refresh