YOU ARE HERE: Home व्हिजन करिअर फेअर

व्हिजन करिअर फेअर

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील दहावी, बारावी, व पदवीचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना करिअरच्या वेगळ्या वाटांची माहीती मिळावी; त्याचबरोबर दहावी, बारावीनंतर कुठल्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घ्यावे, याचे मार्गदर्शन मिळावे; विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये करिअर निवडीसंदर्भात सुसंवाद निर्माण व्हावा; अभ्यासाचा ताण, परीक्षेच्या अपयशातून येणारे नैराश्य यावर कशी मात करावी ? नापास झालेल्या विद्यार्थ्यांना करिअरच्या कुठल्या संधी उपलब्ध आहेत? या संदर्भात विस्तृत मार्गदर्शन व समुपदेशन करण्याकरिता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने निमंत्रक मा. सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील ठराविक जिल्ह्यांमध्ये दरवर्षी व्हिजन करिअर फेअर हे शैक्षणिक प्रदर्शन व करिअर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत आहे. हे करिअर फेअर साधारणता: तीन दिवस आयोजित केले जाते.

या प्रदर्शनात शैक्षणिक संस्था, विविध व्यावसायिक शिक्षणाशी निगडीत संस्था, भारतीय हवाई दल, भारतीय नौदल, भारतीय भूदल, भारतीय नौदल , विविध विद्यापीठे, अनिमेशन, फॅशन ड़ीजाईनिंग, कॉम्पुटर सायन्स, बायोटेक्नॉलॉजी, नृत्य-नाट्य-संगीत, एम.बी.ए., इतर व्यावसायिक शिक्षणाशी संबंधित संस्था, समुपदेशन केंद्र, अभिक्षमता चाचणी आदी शैक्षणिक विषयांशी व करिअरशी निगडित संस्थाचा समावेश या प्रदर्शनामध्ये असतो. तसेच व्याख्यानमालेमध्ये विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींबाबत तज्ञ व्यक्तींची व्याख्याने आयोजित केली जातात. व्हिजन करिअर फेअरद्वारे हजारो ग्रामीण व निमशहरी विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्चशिक्षण व करिअर निवडीबाबत मार्गदर्शन लाभले आहे.