YOU ARE HERE: Home यशवंत युवा फेलोशिप

यशवंत युवा फेलोशिप

निसर्ग व मानवी जीवनामध्ये भेडसावणार्‍या विविध मुलभुत प्रश्नांची तीव्रता जाणुन सामाजिक क्षेत्रात रचनात्मक कार्य सुरु केलेल्या युवांना प्रोत्साहन, तज्ञांचे मार्गदर्शन व आर्थिक पाठबळ देण्याकरीता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई ने सन 2010 यावर्षी ‘यशवंत युवा फेलोशिप’ हा उपक्रम सुरु केला आहे.

या उपक्रमामध्ये महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, कोंकण व प. महाराष्ट्र या 4 विभागांमधुन प्रत्येकी एका युवा कार्यकर्त्याची 2 वर्षांकरीता ‘फेलो’ म्हणुन मुलाखतीद्वारे निवड केली आहे. सदर फेलोने या 2 वर्षांमध्ये निश्चित ध्येय ठेवुन त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये अभ्यास व कृती कार्यक्रमांचे नियोजन व अमंलबजावणी करावयाची असुन फेलोंना मदत म्हणुन त्यांनी निवडलेल्या विषयातील तज्ञ व्यक्ती त्यांना मार्गदर्शक म्हणुन उपलब्ध आहेत. याच कार्यकाळामध्ये फेलोंकरीता नियमितपणे प्रशिक्षणं व अभ्यासदौरे देखिल आयोजीत केले जाणार आहेत.

उद्देश :
समाजाला भेडसावणाNया प्रश्नांवर मात करण्यासाठी सामाजिक क्षेत्रात रचनात्मक कार्य सुरू केलेल्या युवांना मार्गदर्शन, आर्थिक पाठबळ व प्रोत्साहन देणे.

आवाहन

`घडवू या - घडू या'
का करतायेत शेतकरी आत्महत्या? का अपयशी ठरतेय रोजगार हमी योजना? इतक्या शासकीय योजना असताना का वाढतेय शहरी आणि ग्रामीण दरी? का वाढतेय आर्थिक विषमता? का होतायेत स्थलांतरणं? का वाढतेय शाळा गळती? झेड.पी. आणि मनपा शाळांचा का घसरतोय दर्जा? का वाढतेय बेरोजगारी? का करतायेत युवा आत्महत्या? का वाढताहेत व्यसनं? का वाढतेय धार्मिक आणि जातीय तेढ? का होत नाहीये पाणी आणि विजेचे नियोजन? का खालावतेय पर्यावरण? का वाढतोय कचरा? का कमी होत नाहीयत कुपोषण आणि बालमृत्यू? का वाढतेय गुन्हेगारी, हिंसा आणि कौटुंबिक अत्याचार? का वाढतेय राजकीय अनास्था? आणि कोण बदलणार हे सगळं...?

मला वाटतं हे सगळं बदलावं, मला समजून घ्यायचंय, मला लढायचंय या माझ्याच आजूबाजूच्या प्रश्नांकरिता...
तुम्हाला असं वाटतंय? तुम्हाला पडतायेत असे एक ना अनेक प्रश्न? आणि याच तळमळीने शोधायची आहेत तुम्हाला याची उत्तरं?
तर मग या आणि नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या प्रयत्नांमध्ये सामील व्हा...!
समाज जडणघडणीमध्ये योगदान देऊ इच्छिणाNया धडपड्या युवांकरिता नवमहाराष्ट्र युवा अभियान उपलब्ध करून देत आहे एक संधी... समाजासाठी घडविण्याची आणि स्वतः घडण्याची.

`यशवंत युवा फेलोशिप'
या फेलोशिपच्या माध्यमातून नवमहाराष्ट्र युवा अभियान युवा कार्यकत्र्यांचे सामाजिक जाण व भान बळकट करू पाहतेय. चला तर मग, यामध्ये सहभागी होऊ या, घडवू या अन् घडू या...!